Friday, 22 April 2011

गोड बाबाच्या गोडव्याचे रहस्य


माझा जन्म व शिक्षण अकोले या आदिवासी तालुक्यात झाले. महाविद्यालयीन जीवनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे काम करताना अनेक गोष्टी शिकायला अन् अनुभवायला मिळाल्या. विज्ञानातीला शोधांचा गैरवापर करुन अनेक भोंदु बाबा आपले उखळ पांढरे करुन घेत. गरीब, अडाणी जनतेला फसवून पैसे गोळा करणारे भोंदु बाबा, भगत, देवरूशी गावागावात ठाण मांडून होते. 
 
          अशाच एका गावात एक बाबा स्वत:ला गोड बाबा म्हणवून घेत असे. कारण तो ज्या वस्तुला हात लावायचा ती वस्तू गोड बनून जाई. या गोड बाबाचे भांडाफोड आम्ही केले. तेंव्हा एक गमतीदार गोष्ट समोर आली. हा बाबा आपल्या हाताला सॅकरीनची गोळी चोळत असे. या गोलीमुळे प्रत्येक वस्तू गोड होऊन जाई.
 

सॅकरीन काय आहे?
 

कॉंस्टेंताइन फॅल्बर्ग आणि इरा रॅम्सन,  जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी मधे संशोधक महणून काम करत होते. प्रयोगशाळेमधे कॉल तारांवर काही परीक्षण करताना एक रसायन चूकीने त्यांच्या हातावर पसरून गेले. हात धूणे विसरून ते जेवणास बसले. सॅंडविच खाताना त्यातून एकाला वाटले कि ब्रेड फार गोड लागतोय. बर्‍याच शोधनंतर त्यांना आढळलं की हा गोडवा बेंजोइक सल्फिनाइड रसायणाचा होता. ज्याला साधारणपणे सॅकरीनच्या नावाने ओळखतात. सॅकरीन साखरेच्या ठीकाणी वापरण्यास यायला लागले आहे कारण त्यात अजिबात कॅलोरीझ नसते. ही खरोखरच एक गोड दुर्घटना होती!

कधी-कधी चूका देखील चांगल्या म्हणून सिध्द होतात.
सौजन्य: www.kavadsa.co.cc

0 comments:

Post a Comment