Friday, 22 April 2011

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दीप ज्ञानाचा

अकोले तालुक्यातील ज्ञानदीप प्रतिष्ठानने नुकतेच 'गुणवत्तापूर्ण शिक्षण' या विषयावरील दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. वैशाखातला उष्मा, लग्नसराई, जनगणनेच्या कामाचा ताण आणि उन्हाळी सुट्टीतही सुमारे ३५ ते ४० शिक्षक या दोन दिवसांच्या कार्यशाळा जातीने हजर होते. केवळ उपस्थित न राहता त्यांनी कार्यशाळेत कृतीशील सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे आयोजन, नियोजन, संयोजन सर्व शिक्षकांचेच. हि कार्यशाळा म्हणजे एका अर्थाने स्वत:ला समृद्ध करण्यासाठी शिक्षकांची धडपड होती, असेच म्हणावे लागेल.
ज्ञानदीप प्रतिष्ठान ही तालुक्यातील धडपडणाऱ्या मुख्यत: प्राथमिक शिक्षकांनी अलीकडेच स्थापन केलेली संस्था या संस्थेने भारत ज्ञानविज्ञान समुदाय दादासाहेब रुपवते फौंडेशन यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. शिक्षकांनी स्वत: पुढाकार घेत अशा प्रकारचा विधायक उपक्रम आयोजित केल्याचे हे उदाहरण तसे दुर्मिळच. सरकारी प्रशिक्षणाबाबत शिक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच शिक्षक अशा प्रशिक्षणात नाविलाज म्हणून सहभागी होतात. अनेकदा प्रशिक्षण वर्ग कांटाळवाणे
असतात. त्यामुळेच शिक्षकांच्या टीकेचा विषय बनली आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेतील शिक्षकांचं सक्रिय सहभाग निश्चितच दिलासा देणारा होता. भले त्यांची कमी असेल पण शिक्षक स्वत:हून धडपडू लागेल नवीन वाटा धुंडाळू लागले हे चित्र आश्वासक आहे या गोष्टीचे निश्चितच स्वागत करायला हवे एरवी सरकारी प्रशिक्षणाला दांड्या मारणारे या कार्यशाळेत पूर्णवेळ उपस्थित होते शाळा सुरु असताना पाच वाजले कि ज्यांना घरी जायची ओढ लागते असे शिक्षक सात वाजेपर्यंत कार्यशाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहत होते तेही कोणत्याही स्वरूपाचे भत्ते नसताना. शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाची करणे वेगवेगळी असावीत काहींना शिक्षकांची मलीन झालेली प्रतिमा खुपते असेल स्वत:ची एक वेगळी ओळख तर काहींना गुणवत्तेची आत
आंतरिक ओढ लागली असेल. कारण काही असले तरी आपण करू आपला उधार ही त्याची भूमिका निश्चितच आशादायक आहे. शिक्षकांनी उपक्रमशीलता वाढविणे हा या कार्याशाळेमागचा मुख्य उद्देश. शैक्षणिक गुणवत्तेचा आग्रह सर्वचजण धरतात पण गुणवत्ता नेमके कशाला म्हणायचे? परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीला का नेतृत्वाच्या जडणघडणीला. या बाबतीत संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षक  भांबावलेला आहे. या बाबत शिक्षकाला निश्चितच दिशा व दृष्टी मिळावी, हाही कार्यशाळेचा दुसरा हेतू. शिक्षण
क्षेत्रातील कार्यकर्ते किशोर दरक यांनी गुणवत्तेचे विविध पैलू उलगडून दाखविताना शिक्षकांना नवीन दृष्टीकोन निदर्शनास आणून दिला. सरकारदरबारी गुणवत्ता आकडेवारीत अडकली असल्याचे त्यांनी सांगितले भारतासारखा विषमता आणि शोषण असणाऱ्या देशात जे शिक्षण शोषणाची जाणीव करून देत नाही त्याविरुद्ध लढायला प्रवृत्त करत नाही ते शिक्षण गुणवत्तापूर्ण कसे असा त्यांचा रोकडा सवाल बरेच काही सांगून गेला प्रा. माधुरी दीक्षित यांनी लिंग समभाव या विषयाची मांडणी सहजशैलीत केली त्यांनी दिलेले अभ्यासक्रमातील दाखले, दैनंदिन जीवनातील उदाहरणे उपस्थितांना अंतर्मुख करून गेली. शिक्षकांच्या प्रशिक्षणात स्त्री- पुरुष समानता हा विषय अनेकदा असतो पण अशा प्रकारे या विषयाची मांडणी कोणत्याच प्रशिक्षणात शिक्षकांना ऐकायला मिळाली नव्हती. परिसर भेट हा अभ्यासक्रमांचा अविभाज्य भाग झाला आहे मात्र त्याबाबत नक्की काय बरेचसे शिक्षक अनभिज्ञ आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनील पोते या सामाजिक कार्यकर्त्यांचे नदीचा उगम, गावाचा इतिहास आदी शिक्षणपूरक उपक्रमांचे अनुभव प्रेरक होते. शोभना पांडे यांनी मार्गदर्शन केले तर मुंबई विद्यापीठातील लिंग्वीस्टिक विभागप्रमुख अविनाश पांडे यांनी कला व शिक्षणाबाबतची तात्विक बाजू प्रभावीपणे मांडली. प्रशांतबाबू या कर्नाटकातील कार्यकर्त्याने आनंददायी शिक्षण कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या दोन- अडीच तास चाललेल्या सत्रात शिक्षक मुलासारखे समरस होऊन गेले. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या प्रसाद मेहंदळे यांनी कृतीशील विज्ञान शिक्षण कसे असावे हे सप्रयोग दाखविले. नाशिकच्या आनंदनिकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांचे समारोपाचे भाषण म्हणजे या कार्यशाळेचा  परमोच्चबिंदू होता. प्रचलित शिक्षणव्यवस्थेची भेदक शब्दांत चिरफाड करताना त्यांनी वास्तवाचे भान आणून दिले, तर दुसरीकडे शिक्षणात
उपक्रमशीलता कशी आणावी याचे अनुभवजन्य असे प्रेरक मार्गदर्शन केले. त्यांचे भाषण शिक्षकांना आत्मभान आणून देणारे होते. शिक्षणतज्ञ, अधिकारी, समाज, सरकार या सर्वांच्याच आज शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक धडपडणाऱ्या
शिक्षकांनाही काहीतरी करावयाचे आहे. पण त्यांनी नक्की काय करायला पाहिजे, याचे सुस्पष्ट मार्गदर्शन कोणीच करीत नाही डी.एड., बी.एड., महाविद्यालये याबाबत काहीच देत नाहीत. अनेक शिक्षकांत ऊर्जा आहे. काही करण्याची उमेद आहे. मात्र,
त्यांना घडवायचे असेल तर पैलूच पाडावे लागतील. त्यादृष्टीने शिक्षकांनीच पुढाकार घेऊन सुरु केलेले असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतील. अकोले महाविद्यालयाचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले. दादासाहेब रुपवते फौंडेशनने मोठा
भार उचलला. तसेच फौंडेशनच्या उत्कर्षा रुपवते या दोन्ही दिवस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत उपस्थित उपस्थित होत्या.ज्ञानदीप प्रतीष्ठानचा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.

- प्रकाश टाकळकर (प्राचार्य, सर्वोदय विद्या मंदिर राजूर)

गोड बाबाच्या गोडव्याचे रहस्य


माझा जन्म व शिक्षण अकोले या आदिवासी तालुक्यात झाले. महाविद्यालयीन जीवनात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे काम करताना अनेक गोष्टी शिकायला अन् अनुभवायला मिळाल्या. विज्ञानातीला शोधांचा गैरवापर करुन अनेक भोंदु बाबा आपले उखळ पांढरे करुन घेत. गरीब, अडाणी जनतेला फसवून पैसे गोळा करणारे भोंदु बाबा, भगत, देवरूशी गावागावात ठाण मांडून होते. 
 
          अशाच एका गावात एक बाबा स्वत:ला गोड बाबा म्हणवून घेत असे. कारण तो ज्या वस्तुला हात लावायचा ती वस्तू गोड बनून जाई. या गोड बाबाचे भांडाफोड आम्ही केले. तेंव्हा एक गमतीदार गोष्ट समोर आली. हा बाबा आपल्या हाताला सॅकरीनची गोळी चोळत असे. या गोलीमुळे प्रत्येक वस्तू गोड होऊन जाई.
 

सॅकरीन काय आहे?
 

कॉंस्टेंताइन फॅल्बर्ग आणि इरा रॅम्सन,  जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी मधे संशोधक महणून काम करत होते. प्रयोगशाळेमधे कॉल तारांवर काही परीक्षण करताना एक रसायन चूकीने त्यांच्या हातावर पसरून गेले. हात धूणे विसरून ते जेवणास बसले. सॅंडविच खाताना त्यातून एकाला वाटले कि ब्रेड फार गोड लागतोय. बर्‍याच शोधनंतर त्यांना आढळलं की हा गोडवा बेंजोइक सल्फिनाइड रसायणाचा होता. ज्याला साधारणपणे सॅकरीनच्या नावाने ओळखतात. सॅकरीन साखरेच्या ठीकाणी वापरण्यास यायला लागले आहे कारण त्यात अजिबात कॅलोरीझ नसते. ही खरोखरच एक गोड दुर्घटना होती!

कधी-कधी चूका देखील चांगल्या म्हणून सिध्द होतात.
सौजन्य: www.kavadsa.co.cc

असामान्य साहस

सहावा मुघल बादशहा औरंगजेब (१६५९-१७०७) हा एक कपटी राजा होता. आपले इप्सित साध्य करण्यासाठी तो जवळच्या संस्थानांच्या राजामहाराजांशी मैत्रीचे खोटे नाटक करीत असे. राजस्थान मधील जोधपूर संस्थानावर औरंगजेबचा डोळा होता, पण जोधपूरचा महाराजा यशवंतसिंग हा त्याला सवाई होता.

महाराजा यशवंतसिंग व युवराज पृथ्वीसिंग यांनी बादशहाच्या निमंत्रणावरून आगर्‍याला भेट दिली. औरंगजेबाने त्यांना शाही उद्यानांत नेले आणि राज बागेतील वैभव दाखवले. महाराजा यशवंतसिंगांनी त्या सौंदर्याचे कौतुक केले, शेवटी औरंगजेबाने उद्यानाच्या टोकाला असलेल्या एका मोठ्या पिंजर्‍याकडे त्यांचे लक्ष वेधले, तेव्हां या पाहुण्यांनी त्यांत विशेष स्वारस्य दाखवले नाही. बादशाहाला आश्‍चर्य वाटले, कारण त्या पिंजर्‍यात  त्याचा सर्वांत आवडता असा एक धिप्पाड, उग्र मुद्रेचा भयंकर वाघ होता.

बादशाहाने अभिमानाने विचारले ‘‘महाराज, असे उमदे जनावर तुम्ही कधी बघितले होते कां? याची डरकळि देखील मोठ मोठ्या विरांना घाबरवून सोडते.’’

यशवंतसिंगाने वाघाकडे एकवार बघून म्हटले, ‘‘कोणत्या शूरवीरांबद्दल आपण बोलत आहात, जहांपन्हां? माझ्या राज्यांत लहान मुले देखील असल्या जनावरांबरोबर खेळतात.’’

‘‘हो कां?’’ औरंगजेब रागाने म्हटला.
‘‘आपला विश्‍वास नाही कीं काय?’’ महाराजाने गंभीर स्वरांत विचारले.

बादशाहा तोर्‍यांत म्हणाला,"अशक्य! या वाघाच्या शेपटीला हात लावण्याचे साहससुधा तुमच्या संस्थानातील कुणीही करू शकणार नाही आणि तसे करणारा क्षणभरही जिवंत राहणार नाही!’’

‘‘आपल्याला शंका आहे तर!’’ असे म्हणून महाराजानी आपल्या तरुण मुलाकडे बघितलं.

युवराज पृथ्वीसिंगाला पित्याचा हेतू समजला. त्याने तडक पिंजर्‍याचे दार उघडले आणि तो आंत घुसला. चिडलेला वाघ त्याच्यावर चालून आला. युवराजाने वाघाच्या तोंडावर एक ठोसा मारला आणि वाघ भेलकांडत खाली पडला. युवराज आणि वाघामधील लढाई  औरंगजेब विस्फारलेल्या डोळ्यांनी, अविश्वासने हा प्रसंग बघत होता. शेवटी वाघ खाली मरुन पडला आहे याची खात्री करुनच जखमी झालेला युवराज रक्ताळलेल्या अंगाने पिंजर्‍याबाहेर पडला.

थक्क झालेल्या औरंगजेबाने लाजिरवाण्या मुद्रेने युवराजाचे कौतुक केले. त्याची ताकद, धैर्य, कौशल्य, याबरोबरच वडिलांच्या शब्दाला मान देण्याबद्दल बादशहाने प्रशंसा केली. महाराजाने औषधोपचारासाठी मुलाला आपल्या तळावर नेले. युवराज लौकरच बरा झाला.

पण औरंगजेबाला हा अपमान जिव्हारी लागला होता. काही काळानंतर त्याने पराक्रमी पृथ्वीसिंगाला कपटाने ठार मारले.
सौजन्य: www.kavadsa.co.cc

गरीबी आणि श्रीमंती

एकदा एक श्रीमंत बाप आपल्या मुलाला गरीबी काय असते ते दाखविण्यासाठी एका दूरच्या खेड्यात सहलीसाठी घेऊन जातो. 3 दिवस व रात्री तेथे राहिल्यानंतर ते पुन्हा आपल्या शगरातील बंगल्यात येतात. सह्ळीवरुन परतल्यानंतर वडील मुलाला प्रश्न विचारतात “सहल कशी होती?”
मुलगा:”खूपच छान! पिताजी.”
वडिल:”गरीब लोक कसे राहतात हे तू बघितलेस ना?”
मुलगा:”हो.”
वडिल:”तर मग मला सांग की या सहळीमधून तुला काय शिकायला मिळाले.”
मुलगा उतरला:”आपल्याकडे एक कुत्रा आहे आणि त्यांच्याकडे चार. आपल्या बागेच्या मधे एकच छोटासा तलाव आहे अन् त्यांच्याकडे विस्तीर्ण सरोवर. आपल्या बागेत परदेशातून मागविलेले किंमती विद्युत दिवे आहेत तर त्यांच्या बागेत आकाशातील तारे. आपले आंगण समोरच्या रस्त्यजवळ संपते. तर त्यांचे आंगण क्षितिजपर्यंत विस्तरालेल.”
“आपण जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यात राहतो तर त्यांच्याकडे नजरेच्या पलीकडे पसरलेली जमीन आहे.”
“आपल्याकडे सेवा करण्यासाठी नोकर आहेत तर ते दुसर्यांची सेवा करतात.”
“आपण आपले अन्न खरेदी करतो तर ते स्वत:चे अन्न स्वत: पिकवितात.”
“आपल्या बंगल्याचे रक्षण करण्यासाठी बाजूला भिंत आहे. पण त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला त्यांचे मित्र आहेत.”
यावर मुलाचे वडील निरूत्तर झाले.
शेवटी मुलगा उतरला:”धन्यवाद पिताजी! आपण किती गरीब आहोत हे दाखविल्याबद्दल.”

सौजन्य: www.kavadsa.co.cc

आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे

परकीय सत्तेशी प्राणपणाने लढ़नारया आदिवासी महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चलवलित मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरे हा या परंपरेतील एक भक्कम, ताकतवान, धाडसी, रुबाबदार आणि बंडखोर नेता होता. तुघलग आणि बहामनी सुलतानाच्या कालापासून इंग्रजी राजवतीच्या अखेर पर्यंत च्या कालातील  बंडाच्या प्रदीर्घ परंपरेतील  महादेव कोळी या आदिवासी जामातीतील राघोजी भांगरे( भांगरा )   हा सर्वात प्रभावी, पराक्रमी, शूरवीर आणि क्रांतिकारक होता.
पेशवाई बुडाल्यानंतर( १८१८ )  इंग्रजांनी  महादेव कोल्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाट माथे  राखान्याचे आधिकार काढून घेतले. किल्ल्यांच्या शिलेदारया  काढल्या. बुरुज नस्ता केले. वतनदारया काढल्या. पगार कमी केले. परंपरागत आधिकार काढून घेतल्याने महादेव कोल्यान मध्ये मोठा असंतोष निर्माण जाला.  सन १८२८ मध्ये शेतसारा वाढविन्यात आला. सारावसुलीमुले गोरगरीबांना आदिवासींना रोख पैश्याची गरज भासू लागली. ते सावकार , वान्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बालकाऊ लागले. लोक भयंकर चिढले. सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली.  बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली ( १८३० ).  यातून  महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार  राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नए यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतू नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट  यामुले   राघोजी चिढ्ला. नोकरीला लाथ मारुन बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरु जाला. १८३८  मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कैप्टेन मकिन्तोशने हे बंड मोडन्यसाठी सर्व अवघड खिंडी, दरया, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिल्विली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतू बंडखोर वरमले नाहीत . उलट बन्ड़ाने व्यापक रूप धारण केले.इंग्रजांनी कुमक वाढवली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुले काही लोक उलटले. फंदफितुरीमुले रघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. रघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हाजारांचे बक्षीस जाहीर केले. 
ठाणे गाजेटियर्स   जून्या आवृतित "ओक्टोम्बर१८४३ मध्ये राघोजी मोठी टोली घेऊन घाटावरुन खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले" असा उल्लेख आहे. राघोजीने मार्वाद्यानवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाना विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुले चिडलेल्या रघोजीने टोली उभारून नगर ओ नाशिक मध्ये इंग्रजांना सालो की पालो करून सोडले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पलाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गाजे टियर्स मध्ये सापडतो.
सातारयाच्या पदच्यूत छत्रपतीनना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजां विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छल करणार्या सावाकरान्ना धडा शिकविने या हेतूने राघोजी खानदानी  वसूल करीत असे. राघोजीच्या बंडा नंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बलवंत फडके यांचे बंड सुरु जाले.नोव्हेंबर१८४४ ते मार्च १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्या नंतेर रघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत ' अशी भूमिका जाहिर केली होती. कुटूमबातील समाजातील स्रियाँ बद्दल राघोजीला अत्यन्त आदर होता. टोली तील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ति होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रिंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडा च्या कालात तो देव दर्शनाला गेला होता.

तामकड्याची सहल

           पर्यावरणाबाबत मुलांमध्ये सजगता निर्माण व्हावी यासाठी इ. १ ली पासूनच परिसर अभ्यास हा विषय प्राथमिक शिक्षणात समाविष्ठ करण्यात आला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाबाबत मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्ग हे उघडे पुस्तक असल्याचे सांगितले आहे. हे उघडे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचावे. हिरवाईने नटलेल्या निसर्गाशी आपले नेमके नाते काय आहे, हे जाणून घ्यावे या हेतूने तामकड्याच्या धबधब्याकडे जाण्याचे ठरले. मुलांना तसे सांगितले तेव्हा ती आनंदाने उड्याच मारू लागली. 
           मात्र वनभोजनापुरता उद्देश मर्यादित नव्हताच. पर्यावरणाच ढासळत चाललेलं संतुलन सावरणं. वाटेतून जाता - येता विद्यार्थ्यांनी पिके, शेतात राबणारे शेतकरी सिंचनाच्या आधुनिक सोयी व परिसराचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करावे, हाही हेतू होताच. ठरल्याप्रमाणे मुले मोठ्या उत्सुकतेने जमली होती. शाळेपासून दिडेक मीटरचे अंतर बघता बघता संपले. बहिरवाडीच्या शिवारातून जाताना फुलवाऱ्यात आलेली वाऱ्यावर डोलणारी  बाजरीची शेत, मन वेधून घेणारी झेंडूची लाल पिवळी फुलं, जवळचे हिरवा शालू परिधान केलेले डोंगर हा सारा निसर्गरम्य परिसर जवळून पाहण्याचा योग आज जुळून आला होता. 
           तामकड्याच्या जंगलतल्या पूर्वेकडील पायवाटेने तांडा चालू लागला. मोराचा केकारव, पक्षांची किलबिल सुरु होती . निर्झर खळखळ गाणे गात जणू स्वागताला सज्या होते. दाट झाडीतल्या एका पायवाटेने मुलांची दिंडी जात होती. प्रसंगी शिक्षकांशी चर्चा करत होते. प्रश्न विचारत होते. निसर्ग आणि यांचे अतूट नाते आहे, याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत होता. दाट झाडीच्या जंगलातून जाणाऱ्या या वाटेने सोबतीला असलेले गावकरी  वाघाच्या राहण्याच्या गुहा, वानरटोक, चोरनळी, भीतीचा मोख, माची अशा भूरचना दाखवत होते. कुतूहलमिश्रीत नजरेने मुले हे सारं ऐश्वर्य पाहताना स्वतःला निसर्गात हरवून बसली होती.यातील काही भित्री मुले पुढे पुढे धिटाईने सारे काही न्याहाळत होती. माऊलाईच्या धबधब्या जवळ  पोहोचल्यानंतर तर मुलांच्या मनाला अक्षरशः उधान आले होते. धबधब्याजवळ उभे राहून फोटो घेता घेता सारेजण या जलप्रपाताच्या परमात पडले. मुले पाण्याशी लगट करू लागले. पाण्याची, जंगलाची, काडेकापारीची  अनामिक भीती त्यांच्या मनातून कुठल्या कुठे पळून गेली होती. धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजताना निक्स्र्गाचे अनोखे संगीत ऐकताना सारे निसर्ग तत्वाशी एकरूप होऊन गेले. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी अंगावरील कपड्यांनिशी गाढ आलिंगन दिले. विद्यार्थी - शिक्षक नात काही काळासाठी सारेच विसरले होते. 'मैत्री'  धाब्धब्याशी अन नात निसर्गाशी ! असेच एकूण चित्र दिसत होते. तेथेच दुपारचे जेवण सर्वांनी मिळेल त्या जागी बसून घेतले. पाखरांच्या किलबिलाताटात मुलांची किलबिल एकरूप झाली होती. कोण कोलांट्या उड्या मारी, तर कोण झाडावर चढत होता. कोणी झाडाच्या फांद्यांचा झोपाळा केला होता. काही मुलांनी सागाच्या पानाच्या छानदार टोप्या बनविल्या होत्या. तीन बाजूनी डोंगररांगानी वेढलेल्या परिसरात मुले आता चांगलीच विसावली होती. काही मुलांनी सोबत आणलेल्या सीताफळ, सुबाभूळ, जांभूळ, बोर यांच्या बिया येथे लावल्या. वानविभागाचे अधिकारी श्री. दामू चासकर यांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा करत प्राणी, पक्षी आणि परिसराची ओळख करून दिली.यावेळी त्यांनी पक्षांची नावे विचारल्यानंतर वर्गात शांत वाटणारा किरण पथवे या विद्यार्थ्याने एकदम दहा पक्ष्यांची नावे सांगितली व सध्या सुगरणीचा विणीचा हंगाम सुरु आहे अशी जास्तीची माहितीही त्याने दिली. दुसरा एक आदिवासी ठाकर समाजातील वैभव पथवे या विद्यार्थ्याने डझनभर औषधी वनस्पतींची नावे सांगितली. याखेरीज त्या वनस्पतींची माहिती आणि विशेष म्हणजे औषधी गुणधर्मही त्याने सांगितले. बिनभिंतीच्या शाळेत विद्यार्थी अनेक गोष्टी शिकतात. त्याचे प्रकटीकरण यावेळी झाल्याचे पाहायला मिळाले. आता रिमझिम पावसाच्या सारी अंगावर घेत सर्व जणपरतीच्या प्रवासाला लागले. दिवसभर वेगळ्याच भावविश्वात  रममाण झालेल्या मुलांची पावले माघारी फिरताना जडावली होती. बहुतेकजण मानाने तेथेच रेंगाळले होते...